यड्रावमधील न्यू हायस्कूलमध्ये सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

0
183

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  यड्राव  (ता.शिरोळ) येथील विनायक दामोदर सावरकर दि  न्यू हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस  आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांची जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे  पूजन करून अभिवादन करण्यात आले.  

याप्रसंगी हायस्कूलच्या संस्थापक कार्यवाह सिंधुताई जाधव,  सल्लागार समितीचे चेअरमन प्रकाश टाकळे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कुणालसिंह नाईक निंबाळकर,  सुमेर सुतार,  शिक्षक भगत,  मोहिते, कांबळे , सांगावे मॅडम आदीसह  शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.