सखी महिला मंडळातर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन  

0
79

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महिलांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत असणारे सखी महिला मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रमजानभाई अत्तार, प्रा. बाळासाहेब आजळकर यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या फोटोचे पूजन करून हार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल. सामाजिक कार्यकर्ते रमजानभाई अत्तार यांचा तर शिवराज महाविद्यालयाचे प्रा. बाळासाहेब आजळकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

उज्ज्वला दळवी यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. नगरसेविका अरूणा शिंदे यांनी आभार मानले. यावेळी अलका भोईटे, उर्मिला कदम, शारदा आजळकर,  सुमन सावंत, नगरसेविका रूपाली परिट, सुवर्णलता गोईलकर, सुनंदा गुंठे आदीसह  महिला उपस्थित होत्या.