जिल्हा परिषद, महापालिकेतर्फे संत रोहिदास महाराज यांना अभिवादन

0
48

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संत रोहिदास महाराज यांची जयंती जिल्हा परिषद आणि महापालिकेत आज (शनिवार) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  

जि.प. मध्ये सदस्य जयवंतराव शिंपी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) अरुण जाधव यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी सुशांत रेवडेकर आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे उपआयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुनिल गेजगे, देवानंद कांबळे, इरशादभाई शेख, अरुण जमादार, शंकरराव मकोटे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.