दऱ्याचे वडगाव येथे जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊंना अभिवादन…

0
220

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथे आज (मंगळवार) राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ ई-सेवा केंद्रामार्फत, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच गावातील पहिली ते दहावीच्या सर्व मुलींना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. तर साखर, पेढे गावामध्ये वाटत राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर कुंभार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिल मुळीक होते.

यावेळी मनीषा चौगले, उपसरपंच दिगंबर कुंभार, तंटामुक्त अध्यक्ष नानासो बेनके, बंटी जाधव, रवींद्र थेरगावे,आनंदा लिंगडे, पाडळकर, ओमकार बेनके, रितेश सुतार, सोनिया सुतार,  ग्रामसेवक पांडूरंग जगताप, ग्रामस्थ, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.