वालावलकर हायस्कूलमध्ये महात्मा फुले यांना अभिवादन

0
92

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील  आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये आज (शनिवार) महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकार यांनी महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रतिमेस पुष्पाहार अर्पण केला. इयत्ता सातवीच्या वर्गशिक्षिका पल्लवी गंगधर यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रफीत सादर करून इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना व्हाट्सएप ग्रुपवर त्याचे प्रक्षेपण केले. उपमुख्याध्यापक बाळाराम लाड यांनी फुले यांच्या जीवनसंघर्षातील महत्त्वाच्या क्षणांचा आढावा घेऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी पल्लवी गंगधर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुरगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल मृदुला शिंदे यांनी महात्मा फुले ग्रंथसंपदेचे प्रदर्शन भरवले. शेवटी एस. पी. पाटील यांनी आभार मानले.