हमिदवाडा (प्रतिनिधी) : सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम व बॉयलर प्रदीपन शुभारंभ कार्यक्रम लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी कारखाना स्थळावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिनकरराव जाधव आणि मारूतीराव जाधव आणि भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले उपस्थित होते. बॉयलर प्रदीपन कारखान्याचे चेअरमन खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले की, येणारा कारखाना गळीत हंगामात उंच्चाकी गाळपाने यशस्वी करूया. त्यामुळे येणारा हंगामात ७ लाख मेट्रीक टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच डिसलरी प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर खासदार म्हणून निवडून येऊन आल्यानंतर वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी कार्यपुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यातील कामगिरीचे ठळक मुद्दे सांगून सरकारने खासदार फंड जरी बंद केला असला, तरी निश्चितच केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवण्याचा विश्वास व्यक्त केला.

मागील २० वर्षे पूर्ण बंद असलेल्या ई एस आय हॉस्पिटलला सुरू करून त्याचा लाभ ५ लाख कामगारांना मिळणार आहे. तसेच काजू प्रक्रिया आणि बोर्ड चंदगड येथे सुरू करण्यास प्रयत्नशील आहे. आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टन्स राखून कारखान्यावर आल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी मंडलिक आणि जाधव कुटुंबाचे ४० वर्षाचे ऋणानुबंध आहेत. लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रत्येक निर्णयाला सदैव आम्ही पाठींबा दिला आहे. आणि येथून पुढे ही तो राहणार आहे. असे मत व्यक्त करत स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिकांच्या यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी  मंडलिक कारखान्याचे व्हाईस चेअरमन बंडोपंत चौगले, युवा नेते विरेंद्र मंडलिक, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, पंचायत समिती सदस्य विजय भोसले, राहुल महाडिक,  नगरसेवक कागल चंद्रकांत गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यजीत पाटील, मंडलिक कारखान्याचे आजी माजी संचालक, मुरगूड आजी माजी नगरसेवक व  मंडलिक यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.