क्रांतीदिनानिमित्त भुदरगड प्रशासनाच्या वतीने क्रांतीज्योतीस अभिवादन…

0
71

गारगोटी (प्रतिनिधी) : आज (सोमवार) क्रांती दिनाच्या निमित्ताने भुदरगड प्रशासनाच्या वतीने गारगोटी येथील क्रांतिज्योतीस पुष्पचक अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या क्रांतीज्योतीस पुष्पचक्र अर्पण केले. तसेच हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी आनंद चव्हाण, ए. एस. तिकोडे,  सुरेश गुरव, एल. यु. बिकट, संतोष पाटील, एस. पी. पवार, सुहास सरगर, आनंदा पाटील, आनंदा गुरव, गारगोटीचे तलाठी राजन शिंदे, अधिकारी, कर्मचारी, तलाठी उपस्थित होते.