गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाबाधितांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठ्या  प्रमाणात तुटवडा आहे. शासनाने हे इंजेक्शन रुग्ण संख्येच्या प्रमाणात पुरवठा करावे, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. येथील उपजिल्हा रूग्णालय कोविड सेंटर आणि कै. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय भेटीवेळी ते बोलत होते.

येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्लांटची पाहणी करून, घाटगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कोरोना योध्यांना घाटगे यांच्या हस्ते संरक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सुपरस्प्रेडर्सची रॅपिड टेस्टिंग वाढवण्याचीही गरज व्यक्त केली.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, महिला आघाडी अध्यक्षा बेनिता डायस, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, रवींद्र घोरपडे, तुषार मुरगुडे, शैलेंद्र कावणेकर, गणपतराव डोंगरे, अजित जामदार आदींसह वैद्यकीय कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.