शाहू गव्हर्मेंट बँकेस बेस्ट चेअरमन, मॅनेजमेंट पुरस्कार

0 67

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय सहकारी बँकेच्या परिषदेत देश पातळीवरीळ बँकांमधून पगारदार नोकरांचे बँका या वर्गातून राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स को-ऑप बॅंकेस दोन पुरस्कार मिळाले आहेत. गोव्याचे सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते अध्यक्ष प्रकाश पाटील यांना बेस्ट चेअरमन आणि बँकेस बेस्ट  एन पी ए मॅनेजमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बेस्ट एन पी ए व्यवस्थापन एन पी ए मॅनेजमेंट बँकेचे उपाध्यक्ष भरत पाटील, संचालक रविंद्र पंदारे यांनी स्वीकारले. बँकिंग क्षेत्रांमधील नामांकित साहित्य बँकिंग फॅक्टर्स, दिल्ली यांच्यावतीने गोवा येथे पुरस्काराचे आयोजन केले होते.

राजर्षी बँकेच्या ठेवी रु १६९ कोटीचा असून कर्ज रु ११६ कोटी  कर्ज वितरित केली आहे. ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असून, रिझर्व बँकेचे मानांकन ग्रेड १  प्राप्त आहे. तसेच बँकेने सलग ९ वर्ष  एनपीए प्रमाण शून्य टक्के ठेवण्यात यश मिळवले आहे. यापूर्वीसुद्धा सातत्याने बँकेने विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेले आहेत.

यावेळी आ. प्रवीण दरेकर, माजी मंत्री एच. के. पाटील, आयोजक बापू नायर, सहकारी बँकेचे माजी कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड, संचालक मधुकर पाटील, राजेंद्र पाटील, रमेश घाटगे, विलासराव कुरणे, संजय सुतार, जयदीप कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे व मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More