सिबिक इन्स्टिट्युटला महाराष्ट्र शासनाची मान्यता…

0
96

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतातील पहिली इन्क्युबेटेड सह स्टार्टअप इको सिस्टीम असणारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ संलग्नीत व्यावसायाभिमुख पदविका संस्थेस कोल्हापूरमध्ये प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२१- २२ पासून प्रवेशाकरिता महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मान्यता मिळाली आहे.

दोन वर्षे कोरोना महामारीमुळे बारावी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट सह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यांना कौशल्य अवगत करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कोर्सेसमुळे चांगली नोकरी अथवा व्यवसाय चालु करण्यास मदत होणार आहे. यासाठी क्वालिटास कंपनीच्या संयुक्त विद्यमाने अद्यावत एक्सलेन्स सेंटर, आरोग्याशी निगडीत कोर्सेससाठी अद्यावत डायग्नोस्टीक सेंटर तर सर्व इंडस्ट्रीसाठी लागणा-या सॉफ्टवेअर प्रणाली, डिजीटल क्लासरूम व इंटरनेट सह अद्यावत कॉम्प्युटर सेंटरची उभारणी केली आहे.

कोरोना महामारीमुळे ज्या विद्यार्थांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थांना आमच्या संलग्नित ३५ स्टार्टअपमध्ये कमवा व शिका या तत्वावर तासिका बेसिसवर काम उपलब्ध करून दिले जाणार आहेत जेणेकरून असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच  विद्यार्थांना विद्यावेतनही दिले जाणार आहे. तरी सर्व विद्यार्थांनी संस्थेशी प्रवेशासाठी ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी केले.

यावेळी पारस ओसवाल, रमेश कार्वेकर, सचिन कुंभोजे, सुर्यकांत दोडमिसे, प्रतिक ओसवाल, संचालक, प्राचार्य रविंद्र वागवेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.