जिल्हा बँकेत निवृत्तिवेतन खाते उघडण्यास सरकारची मान्यता

0
83

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच निवृत्तांचे वेतन आणि भत्ते अदा करण्यासाठी सरकारने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला परवानगी दिली आहे. याबाबत बँकेने शासनाबरोबर करार केला असून शासकीय कर्मचारी व निवृत्त वेतनधारक यांची वैयक्तिक खाती बँकेकडे उघडण्यासाठी ज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी पत्रकाद्वारे दिली.  

पत्रकात म्हटले आहे की, बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कार्यकारी समितीच्या सभेमध्ये सहकारी संस्थांच्या सभासदांनाही  लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे तसा प्रस्ताव पाठवलेला आहे.

मार्च २०२० अखेरचा ढोबळ नफा विचारात घेऊन संचालक मंडळाने या सभेमध्ये ९.१० टक्के सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले आहे. त्यानुसार बँकेने सर्वच म्हणजे एकूण १,४९७ कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान म्हणून सात कोटी १५ लाखांची रक्कम वितरीत केली आहे.