मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार, आता सरकारकडून निवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून ही समिती सहा जिल्ह्यातील ११२८ कामांची चौकशी करणार आहे. यामुळे फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगत या योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्याचाच आधार घेत काँग्रेसने भाजप आणि फडणवीस यांचेवर निशाणा साधला. जलयुक्त शिवार योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे या योजनेची चौकशी झाल्यास मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येईल, असे काँग्रेससह सत्ताधारी आघाडीने म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. कॅगच्या ताशेऱ्यांनंतर  काँग्रेसने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. ही चौकशी समिती २०१५ पासूनच्या कामांची चौकशी करणार आहे.