निवडे येथे ‘सीईओं’नी केल्या चिमुकल्यांशी गुजगोष्टी

0
467

साळवण (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी निवडे येथील इंदिरा अंगणवाडी शाळेस आज (गुरूवार) सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला. हसतखेळत संवाद साधताना अमन मित्तल चिमुकल्यांशी एकरूप होऊन केले. त्यांनी त्यांच्याशी गुजगोष्टी केल्या. मुलांनी ही त्यांच्या प्रश्नांना न भीता उत्तरे दिली. त्यांच्या उत्तरांनी मित्तल भारावून गेले. त्याचबरोबर अमन मित्तल यांनी निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी जि.प.सदस्य भगवान पाटील, गटविकास अधिकारी भोसले, प्रकल्प अधिकारी पालेकर आदी उपस्थित होते.