अन्‌ गोपीचंद पडळकरांनी धुतले कार्यकर्त्यांचे पाय..!

0
72

सांगली (प्रतिनिधी) : भाजप आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्या कृत्यामुळे अनेक कार्यकर्ते भारावून गेले आहेत. तसेच माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही पडळकरांवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. 

गोपीचंद पडळकरांनी आपण आमदार होण्यासाठी पण करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाय धुवून त्यांना चांदीची चप्पल व दुचाकी प्रदान केली. हा कार्यक्रम आटपाडी तालुक्यातील झरे येथे पार पडला. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.

गोपीचंद पडळकर आमदार होण्यासाठी पायात चप्पल घालणार नाही, असा पण दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी आणि दिवंगत जालिंदर क्षीरसागर यांनी केला होता. तसेच फेटा घालणार नाही, असा पण अमरसिंह देशमुख यांनी केला होता.  दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी यांनी पण केल्यापासून चप्पल घातली नव्हती. तर जालिंदर क्षीरसागर यांनी केस-दाढीचे पैसे घेतले नव्हते. कार्यकर्त्यांचा हे ऋण फेडण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.