टिकटॉकला आव्हान देण्यासाठी गुगलकडून नवे अ‍ॅप..?

0 66

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टिकटॉक व्हिडिओच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला आव्हान देण्यासाठी गुगल नवे अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. गुगल सोशल व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप ‘फायरवर्क’ ची खरेदी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्ट्रीट जर्नलचे वृत्त आहे.

टिकटॉक आणि फायरवर्क या दोन्ही अ‍ॅप्लीकेशनमध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य आहे. पण, फायरवर्कमध्ये थोडेफार फीचर्स वेगळे आहेत. टिकटॉकमध्ये युजर्स १५ सेकंदांचा व्हिडिओ बनवू शकतात, तर फायरवर्कमध्ये युजर्स ३० सेकंदाचा व्हिडिओ बनवता येतो. तसंच यामध्ये उभा-आडवा अशा दोन्ही प्रकारे यामध्ये व्हिडिओ शूट करता येतो.

गुगलशिवाय चीनची मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट Weibo देखील फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहेत. पण, फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांपेक्षा पुढे आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच फायरवर्कने भारतात एन्ट्री केली आहे. तसंच, फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला १०० मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More