कोल्हापूर (प्रतिनिधी) : पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आज (रविवार) शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी बाजार समितीच्या कामांची माहिती दिली.

यावेळी प्रा. जालंदर पाटील यांनी, प्रा. कवाडे यांचे पार्टीच्या कामकाजाबद्दलचे असणारे कार्य हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तसेच प्रा. कवाडे यांनी, अशासकीय प्रशासक मंडळाने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तसेच बाजार समितीचा वाढत्या आलेखाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासक मंडळाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य कल्याणराव निकम, दगडू भास्कर, काकासाहेब सावडकर, सचिव जयवंत पाटील, उपसचिव कृष्णात पाटील, अजित पाटील, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.