धामोड येथे विकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद…

0
171

धामोड (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने केलेल्या विकेंड लॉकडाऊनला आज (शनिवार) धामोड आणि परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी धामोडच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता.

धामोड आणि परिसरातील शेकडो वाडीवस्तीतील लोकांच्या आठवडी बाजारचा दिवस होता. परंतु, धामोड ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता कमिटीने बंदसाठी केलेले आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जय भानोबा व्यापारी असोशिनने येथील सर्व दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे धामोडच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. या बंदला धामोड आणि परिसरातील जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामपंचायत, कोरोना दक्षता कमिटी आणि पोलीस प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.