रांगोळीमध्ये गणेश मुर्तीदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद…

0
245

रांगोळी (प्रतिनिधी) :  रांगोळीमध्ये आज (मंगळवार) भगवा रक्षक तरुण मंडळ, रत्नत्रय मंडळ आणि एकात्मिक बाल विकास योजना (अंगणवाडी) यांच्यावतीने गौरी-गणपती दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला रांगोळीतील नागरीकांनी चांगला प्रतिसाद देत ५०० गणेशमुर्ती दान करण्यात आल्या.

यावेळी सरपंच नारायण भोसले, एकात्मिक बाल विकास योजनेच्या सी.डी.पी.ओ. विद्या माने, अंगणवाडी सेविका, मदतनीस, भगवा रक्षक मंडळाचे अध्यक्ष पिंटु देसाई, रत्नत्रय मंडळांचे अध्यक्ष विद्याधर पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.