लाईव्ह मराठी/ नाना हालंगडे

सोलापूर येथील होम मैदानावर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या स्टाॅलला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार ,जिल्हा कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी विषयक योजनेची माहिती देण्यासाठी कृषी प्रदर्शनामध्ये स्टाॅल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.सदर स्टाॕलमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना,शेती उपयोगी साहित्य अनुदान , राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम याबद्दल भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना सविस्तरपणे माहिती सांगून प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे.

या स्टाॅलला शेतकरी आवर्जून भेट देऊन शासनाच्या योजना व शेती बद्दल अद्ययावत माहिती जाणून घेत आहे.सदर कृषी प्रदर्शनाच्या स्टाॅलमध्ये कृषी विस्तार अधिकारी मधुकिरण डोरले कृषी विस्तार अधिकारी , कृषी अधिकारी अश्विनी ओहळ , विस्तार अधिकारी अश्विनी नलगे, एस.आर.राठोड, कल्याण श्रीवस्ती आदीजण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.