नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील मुलींनाही एनडीए परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज (बुधवार) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुलीही ‘एनडीए’ची परीक्षा देऊ शकतात असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. पुण्यातील ‘एनडीए’ ही लष्कर भरतीसाठी देशातील आघाडीची संस्था आहे, पण मुलींना आतापर्यंत ‘एनडीए’ची परीक्षा देता येत नव्हती. पण न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलींसाठी परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण मुलींना एनडीए परीक्षेतून लष्करात भरती करून घेतलं जाणार की नाही, याबाबत कोणताही निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला नाही.

‘एनडीए’ची आगामी परीक्षा ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा आता मुलीही देऊ शकतात असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. पण मुलींना लष्करी सेवेत भरती करून घेण्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची भरती केली जाते. ही परीक्षा फक्त पुरुषांना देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण अ‍ॅकॅडमी आणि नौदल अॅकेडमी परीक्षा या दोन परीक्षा महिलांनाही देता याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.