गुड न्यूज : कोरोना लसीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती    

0
80

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर इतरही लसी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक राज्यातील काही शहरात लसीची ड्राय रन घेण्यास आजपासून (शनिवार) सुरूवात झाली आहे. परंतु ही लस मोफत मिळणार की? शुल्क भरावे लागणार असा प्रश्न उपस्थित होत असताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज लस मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे. हर्षवर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतल्यानंतर  ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना कोरोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार आहे, असे सांगितले.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर इतरही लसी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारी सुरू केली आहे. देशभरात लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यास आजपासून सुरूवात करण्यात आली आहे. देशभरात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना कोरोनाची लसही मोफत मिळणार असल्याने नववर्षाच्या सुरूवातीला देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.