कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये इचलकरंजी येथील गरीब घराण्यातील सुषमा शेटे हिने गोल्ड मेडल पटकावले.  या स्पर्धेसाठी तेलंगणा राज्यातील २ तर महाराष्ट्रातून ३  मुलींची निवड झाली होती. या ३ मुलींमध्ये इचलकरंजीतून २ मुलींची निवड झाली होती.

नेपाल इंटरनॅशनल हिरोज चॅम्पियनशिप २०२१-२०२२ ऑर्गनाईज्ड बाय युथ स्पोर्ट डेव्हल्पमेंट फोरम नेपाळ रजिस्टर बाय इंटरनॅशनल युथ स्पोर्ट अँड एज्युकेशन फेडरेशन हेल्ड रंगशाला पोखरा या संघटनेच्या  वतीने ही स्पर्धा झाली. सुषमा शेटे हिने गोल्ड मेडल मिळवले. तिला प्रशिक्षक असलम पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. सुषमा शेटे हिच्या यशाबद्दल शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे.