लग्नसराईमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण..

0
47

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : दिवाळीनंतर विवाहसोहळ्याचे अनेक मुहूर्त असतात. यातच महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे दागदागिने. त्यामुळेच सोन्याच्या आणि चांदीच्या भावात आज (मंगळवार) भारतीय बाजारात मोठी घसरण झाली आहे.

लॉकडाऊनमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत वध झाली होती. पण कोरोना लसीबाबत सकारात्मक बातमी आल्यानंतर बाजारात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींवर झाला आहे. मागील २ दिवसांत सोन्याच्या किमतीत १२०० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीचे दरही कमी  झाले आहेत. एमसीएक्सवर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर ०.९ टक्क्यांनी कमी होऊन ४९,०५१ रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीचे दर  ५५० रुपये अर्थात ०.०९ टक्क्यांनी कमी होऊन ५९,९८० रुपये प्रति किलो झाले आहेत.