गोकुळ’ निकाल : चौथ्या फेरीअखेर ‘हे’ उमेदवार आहेत आघाडीवर…

0
707

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निकालाचे कल पाहता सत्तांतर होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण गटासाठीच्या १६ जागांसाठी मतमोजणी सुरू असून चौथ्या फेरीअखेर विरोधी आघाडीतील १३, तर सत्ताधारी गटाचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत.

विरोधी गटाचे हे उमेदवार आघाडीवर – : 

डोंगळे अरुण गणपतराव, पाटील-चुयेकर शशिकांत आनंदराव, तायशेटे अभिजित प्रभाकर, पाटील आबाजी ऊर्फ विश्वासराव नारायण, नरके अजित शशिकांत, चौगले किसन बापूसाहेब, पाटील रणजितसिंह कृष्णराव, नविद हसन मुश्रीफ, गायकवाड कर्णसिंह संजयसिंह, चौगले बाबासाहेब श्रीपती, ढेंगे नंदकुमार सखाराम, पाटील संभाजी रंगराव (एस.आर.), पाटील प्रकाश रामचंद्र

 सत्ताधारी गटाचे हे उमेदवार आघाडीवर – : 

घाटगे अंबरिषसिंह संजय, खाडे बाळासाहेब उर्फ वसंत नानू, नरके चेतन अरुण