गोकुळ निकाल अपडेट : चौथ्या फेरीअखेर विरोधी गटाचे १३ उमेदवार आघाडीवर

0
665

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निकालाचे कल पाहता सत्तांतर होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण गटासाठीच्या १६ जागांसाठी मतमोजणी सुरू असून चौथ्या फेरीअखेर विरोधी आघाडीतील १३, तर सत्ताधारी गटाचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत.

महिला राखीव, अनुसूचित जाती / जमाती गट, भटक्या विमुक्त जाती /जमाती गट आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एकूण ५ जागांपैकी ४ जागा जिंकून विरोधी आघाडीने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. सर्वसाधारण गटातील एकूण १६ जागांसाठी ३३ उमेदवारांनी निवडणूक लढवली. चौथ्या फेरीअखेर विरोधी गटाचे १३ तर सत्ताधारी गटाचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत.