‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे पुन्हा सक्रीय

0
420

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘गोकुळ’चे चेअरमन रविंद्र आपटे आजारपणामुळे मागील चार महिन्यापासून संघाच्या कामकाजापासून दूर होते. प्रदीर्घ विश्रांतीनंतर ते पुन्‍हा एकदा संघाच्या कामकाजात सक्रीय झाले आहेत. शिवजयंतीचे औचित्यसाधून ते संघाच्या ताराबाई कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संघाची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आपटे यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी व्हिडिओ क्लिपद्वारे आपण लवकरच सर्वांच्‍या भेटीला येत आहोत, असे आपटे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे आज शिवजयंती निमित्ताने त्यांनी गोकुळच्या कार्यालयीन कामकाजात भाग घेत आपण तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. गोकुळचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपटे यांचे जल्‍लोषात स्‍वागत करून त्यांना त्यांच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.