कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणुकीबाबत स्पष्टता द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात  दाखल केलेली  याचिका सुनावणीपूर्वीच गोकुळ दूध संघाने आज  (मंगळवार)  मागे घेतली. त्यामुळे नियोजित वेळेप्रमाणे  सुरू असलेला गोकुळ निवडणुकीचा कार्यक्रम  पुढे सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   

राज्य शासनाने २५ फेब्रुवारीला राज्यातील सर्व सहकार संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, यापूर्वी ३८ सहकारी संस्थांना निवडणूक घेण्याबाबत न्यायालयाने परवानगी दिली आहे. या संस्था वगळून सर्व संस्थांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. दरम्यान,  सर्व संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली असताना गोकुळचीच निवडणूक कशी?  ? याविरोधात गोकुळने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र, सुनावणीपूर्वीच गोकुळने याचिका मागे घेतली आहे.