मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे.

गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पुन्हा एकदा वाढ केली आहे. गायीच्या दुधामध्ये लिटरमागे गोकुळने ३ रुपयांची वाढ केली आहे, तर अर्धा लिटरमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर ५४ रुपये झाला आहे. गोकुळकडून ही दुधाची दरवाढ मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात करण्यात आली आहे. आजपासून नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.