गोकुळतर्फे म्हारूळ दूधसंस्था कर्मचाऱ्यांचा सत्कार…

0
74
????????????????????????????????????

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्‍यातील म्‍हारूळ येथील दूधसंस्‍था कर्मचा-यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्‍याबद्दल गोकुळतर्फे गावातील दूध संस्‍था कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघाचे सुपरवायझर वसंतराव  घुरे हे संघाच्‍या सेवेतून निवृत्‍त झाल्‍याबद्दल आणि केनवडेचे कृष्‍णात पाटील यांनी अत्‍यंत गरीब परिस्‍थितीवर मात करीत चार्टर्ड अकौंट परिक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्‍कार करण्‍यात आला. 

यावेळी संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके म्‍हणाले, म्‍हारुळ गावातील सर्व दूध संस्‍था कर्मचा-यांनी एकञ येवून ग्रामपंचात बिनविरोध केली. या कर्मचा-यांनी जिल्‍हामध्‍ये एक आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.

यावेळी रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील, अरूण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्‍वास जाधव, संचालक धैर्यशील देसाई, दिपक पाटील, उदय पाटील पाटील, बाळासो खाडे, सत्‍यजीत पाटील, विलास कांबळे, संचालिका अनुराधा पाटील, विजय उर्फ बाबा देसाई, रामराजे देसाई-कुपेकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील आदी उपस्थित होते.