कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : ‘गोकुळ संलग्‍न’ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पत संस्‍था मर्या. कोल्‍हापूर या संस्‍थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्‍दतीने संस्‍थेच्‍या कार्यालयात चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली.

चेअरमन आसुर्लेकर यांनी संस्‍थेच्‍या अहवाल सालातील प्रगतीचा आढावा सभेपुढे वाचन केला. सध्‍या संस्‍थेचे वसुल भाग भांडवल २१.४७ कोटी, ठेवी ३२.१० कोटी, कर्जे ६७.५३ कोटी, चालू नफा १६.०३ लाख, खेळते भांडवल ६९.८० कोटी असून वार्षिक उलाढाल १३१ कोटी इतकी झाली आहे. संस्‍थेने सन २०१९-२०२० सालातील शेअर्स रक्‍कमेवर १२ टक्‍के डिव्‍हीडंड देण्याचे जाहीर केले. व विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर खेळीमेळीत चर्चाविनिमय होऊन मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन सभेस सभासदांनी मोठ्या संख्‍येने भाग घेतला.

याप्रसंगी संस्‍थेचे चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, व्‍हा. चेअरमन सतिश मदने, संचालक नंदकुमार गुरव, शिवाजी पाटील, परशुराम पाटील, सुनिल घाटगे, राजेंद्र पाटील, संभाजी देसाई, गणपती कागणकर, संचालिका शुभदा पाटील, छाया बेलेकर, संस्‍थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संस्‍थेचे सहा. व्यवस्‍थापक संभाजी माळकर यांनी आभार मानले.