कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या असताना फक्त गोकुळसाठीच वेगळा नियम का? असा प्रश्न उपस्थित करून गोकुळची निवडणूकही स्थगित करावी, या मागणीसाठी गोकुळमधील सत्तारूढ गटाने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज (शुक्रवार) फेटाळण्यात आली.

गोकुळ दूध संघातील सत्तारूढ गटाने प्रथम याच कारणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण ती सुनावणीदिवशीच मागे घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयातही ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आता कोणताही अडसर राहिलेला नाही.