‘गोकुळ’ निवडणूक : जि.प. उपाध्यक्षांचा गडहिंग्लजमध्ये संपर्क दौरा

0
194

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपर्क दौर्‍यास आज (शुक्रवार) सुरुवात झाली. भडगाव- महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातील गोकुळच्या मतदारांची पाटील यांनी भेट घेतली.    

यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, कोल्हापूर जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष उदय जोशी, राष्ट्रवादी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील-मुगळीकर, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, संजय गांधी निराधार योजना समिती गडहिंग्लज तालुकाध्यक्ष अमर चव्हाण, गोडसाखर संचालक प्रकाशभाई पताडे, केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, महाबळेश्वर चौगुले, दशरथ कुपेकर, अभिजीत पाटील, विकी कोणकेरी, नितीन पाटील मुगळीकर, मुन्नासो नाईकवाडी, पी. के. पाटील, भिमराव राजाराम, बाबुराव माने, बाबुराव चौगुले, विकास पाटील आत्याळ, सुरेश रेडेकर, आप्पासाहेब जकात, आप्पासाहेब जाधव, राजू पवार, संजय कांबळे, आदीसह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.