गोकुळ निवडणूक : अर्ज भरताना कार्यकर्ते -पोलिसांमध्ये धक्काबुक्की

0
339

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. करवीर प्रांत कार्यालयात अर्ज भरण्यास आज (मंगळवारी) कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आणि उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

अर्ज भरताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार दिसून आले. उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तर धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.