कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागाच्या विभागीय उपनिबंधक पदी डॉ. महेश कदम यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्याबद्द्ल गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
चेअरमन पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक यांचे हित व सहकारातील मार्गदर्शक तत्वांची जपणूक करत गोकुळची वाटचाल चालू आहे. डॉ महेश कदम यांनी गोकुळ दूध संघास शासकीय स्तरावर सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करावे.
डॉ. महेश कदम म्हणाले की, महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायात गोकुळचे योगदान मोलाचे आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या गोकुळ संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे लाखो शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे.
यावेळी ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह कृ. पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस. एम. पाटील उपस्थित होते.