कोल्हापुरातील ‘या’ गावात बोकडाची दहशत..(व्हिडिओ)

0
163

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मागील काही दिवसांपासून गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावात एका बोकडाचे दहशत माजवली आहे. गावात रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना तसेच मोटारसायकल चालवणाऱ्यांना हे बोकड मागून धडक मारत असल्याच्या घटना घडत आहेत.त्यामुळे या बोकडापासून सावधान रहा, असे फलक गावातल्या चौकात लावण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मी देवाचा बोकड गावातील लोकांनानाहक त्रास देत आहे. गाडीचालक दिसला की तो त्यांचा पाठलाग करत त्यांना मारत आहे. आतापर्यंत त्या बोकडाने १२ जणांवर हल्ला केला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व नागरिकांना याबाबत माहिती कळावी यासाठी गावात एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे. यामध्ये, ‘सर्व नागरिकांना कळविण्यात येते की गावातील लक्ष्मी देवाचा पालवा गाडी धारकांना मारत आहे, याची नोंद घेऊन सावधानता बाळगावी’, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे हे बोकड सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनले आहे.