गोव्याच्या नगरविकास मंत्र्यांनी घेतली शारंगधर देशमुख यांची भेट…

0
105

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोवा मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याचे मंत्री जयेश साळगावकर यांनी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्या निवासस्थानी आज (शुक्रवार) सदिच्छा भेट दिली. साळगावकर यांचे स्वागत व सत्कार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नगरसेवक प्रविण केसरकर, अमर जाधव, संजय कळकुठकर, संदेश हाजपळकर, सुहारसिंग राणे, जिला पेढणेकर, किरण पाटील आदी उपस्थित होते.