‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांचा गौरव

0
139

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नेक्स जेन संस्थे’च्या वतीने ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील कलाकारांना ‘बेस्ट कलाकार’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. इचलकरंजी येथील इंटरनँशनल शॉट फिल्म महोत्सवामध्ये प्रभारी वाहतूक पोलीस निरीक्षक नंदुकमार मोरे यांच्या हस्ते आणि दिग्दर्शक व उपनगराध्यक्ष रवी राजपूत, संस्थेचे चेअरमन सुरज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ही लोकप्रिय मालिका घराघरात पोहोचली होती. कलाकार शेखर फाळके (भेडसगावकर), कृष्णा पाटील (गिरगाव), नंदकिशोर अनुसे (पुलाची शिरोली), पांडुरंग कांबळे, दयानंद जाधव, मारुती कुंभार, मनाप्पा पुजारी, सुरेश कुंभार या कलाकारांच्या उल्लेखनीय अभिनयाबद्दल त्यांना ‘बेस्ट कलाकार’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नेक्स जेन संस्थेचे पदाधिकारी, कलाकार आदी उपस्थित होते.