कलेसोबत रूग्णांची सेवा करणाऱ्या गोविंद चंदनशिवेचा गौरव

0
171

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड काळात सीपीआर रूग्णालयात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सीटी स्कॅन करून सेवा करणाऱ्या गोविंद चंदनशिवे यांचा उल्लेखनिय कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीत स्पॉटबॉय म्हणून काम करणारे बाळासाहेब माने, बबन मिरजे, मानसिंग साळोखे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

गोविंद चंदनशिवे जसा रुग्णांच्या सोबत आपुलकीने वागायचा तसाच तो आपल्या मित्रमंडळीतही रमायचा. गोविंद तसा हरहुन्नरी कलाकार. त्याने कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला असून त्याने आजवर सिनेमा, टीव्ही सिरीयल्स, नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गोविंदने आतापर्यंत त्याच्यातील कलाकारालाच तितकाच समृद्ध केला आहे. अशा या गोविंदचा सत्कार ज्यांनी आपले अखंड आयुष्य मराठी चित्रपटसृष्टीसाठी स्पॉटबॉय म्हणून दिले. त्यांच्या हस्ते गोविंदचा यथोचित सत्कार करण्यात आला. तर बाळासाहेब माने, बबन मिरजे, मानसिंग साळोखे यांचाही सत्कार करण्यात आला.