कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपले गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘म मानाचा,  म महानतेचा, म मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल असून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या लोगोला अनुसरून हे बोल आहेत. या गाण्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, अभिनेते ‘प्लॅनेट मराठी’वर अवतारल्याने हे गाणे अधिकच बहारदार आणि रंजक झाले आहे.

या गीताच लेखन समीर सामंत यांचे असून या गाण्याला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याला स्वप्निल बांदोडकर, आदर्श शिंदे, योगिता गोडबोले, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. पुष्कर श्रोत्री यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यात अक्षय बर्दापूरकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सचिन पिळगांवकर, शरद केळकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, संजय जाधव, अभिजीत पानसे, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, सोनाली खरे, भार्गवी चिरमुले, पर्ण पेठे, स्मिता तांबे, गायत्री दातार, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ मेनन, भाग्यश्री मिलिंद, नेहा शितोळे, दीप्ती देवी, संदीप पाठक, निखिल चव्हाण, तेजस बर्वे, सुरभी हांडे, सुव्रत जोशी आणि शिवानी बावकर यांनी सहभाग घेतला आहे.

आपल्या मराठी भाषेला समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा सातासमुद्रापार पोहोचवण्याचा आणि मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न या गौरवगीतामधून करण्यात आला आहे. तसेच या गौरव गीतामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांमुळे हे गाणे आणखीणच बहारदार झाले आहे.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे गाणे पहावयास मिळणार आहे…: https://youtu.be/uX00Uz4gEEY