कुंभोज (प्रतिनिधी) : शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला अंतर्गत आम्ही सावित्रीच्या लेकी ” या विषयावर नरंदे हायस्कूल येथे मुलींसाठी किशोरवयाचा कालावधी खूप महत्वाचा असतो. या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या वेळी मुलींचे उमलते वय, त्यामध्ये येणारे विचार, स्वतःला आत्मनियंत्रित कसे ठेवावे तसेच मुलींसाठी संतुलित आहार, दररोज व्यायाम,  नियमित अभ्यास करून, आपल्या आईवडिलांना मदत करून स्वतः कडे लक्ष कसे द्यावे,  त्याचबरोबर आजारा पासून दूर राहण्याचे उपाय, खबरदारी सांगून आपला शारीरिक, मानसिक विकास कसा साधावा, विशेषता किशोरवयात मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन डॉ. मनीषा भोजकर यांनी केले.

नरंदे हायस्कूल मध्ये स्व. शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाले अंतर्गत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षीय भाषनात बोलताना संस्था सेक्रेटरी नमिताताई देशमुख यांनी मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आपला आहार, शारीरिक समतोल कसा साधावा हे सांगून मुलींना हे व्याख्यान खूपच फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन केले. प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमास मुख्याध्यापक बी एस खोत, पर्यवेक्षिका एस एस निकम, सर्व शिक्षिका, महिला पालक  आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.