कळे (प्रतिनिधी) : कळे (बेलेकरवाडी), ता. पन्हाळा येथील कुमारी अंकिता शहाजी गोसावी (वय १८) ही ४ डिसेंबरपासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. ती आजतागायत बेपत्ता असल्याची फिर्याद तिचे वडील शहाजी गणपती गोसावी (वय ४७) यांनी कळे पोलिस ठाण्यात दिली आहे.

अंकिता गोसावी ही अंगाने सडपातळ, रंगाने गोरी, उंची अंदाजे ५ फुट, नाक सरळ, केस काळे लांब, कानात रिंगा, गळयात चेन, अंगात आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस, त्यावर काळी जर्सी, पायात पैंजण, सॅन्डल घातलेले आहे.  अशा प्रकारचे वर्णन असलेली मुलगी आढळल्यास कळे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.