कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक दसरा चौकात उपोषणाला बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थनार्थ आज (बुधवार) सायंकाळी दसरा चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांबरोबरच कागल तालुक्यातील संपूर्ण घाटगे गट सायंकाळी उपोषणाची सांगता करण्यासाठी दसरा चौकात एकवटला होता.

उपोषणस्थळी आ. प्रकाश आवाडे, माजी आमदार संपतबापू पाटील, इंदौर गादीचे राजे भूषणसिंह होळकर,  भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक, गंगाराम कांबळे यांचे नातू अरुण कांबळे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अखिलेशराजे घाटगे, आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समिती, कोल्हापूर, राज्य इरिगेशन फेडरेशन, जय शिवराय किसान संघटना यशवंत सेना, कुंभार समाज सामाजिक संस्था, राज्य परीट धोबी सेवा संघ मंडळ, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल, धनंजय महाडिक युवाशक्ती, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना यांच्यासह जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती, सेवा संस्था, दूध संस्था, संघटना यांनी घाटगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पाठिंबा व्यक्त केला.

‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, संजय पाटील, सुनील मगदूम, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, राजेंद्र तारळे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, राहुल देसाई, अनिता चौगुले, युवराज पाटील, सुनील कदम यांनी उपोषणस्थळी हजेरी लावून पाठिंबा देण्यासाठी आलेल्यांचे स्वागत केले.