भूईबावडा घाटमार्गावर रस्ता दुभंगल्याने घाट वाहतूकीस बंद

0
87

साळवण (प्रतिनिधी) : गेल्या पाच दिवसापासून गगनबावडा व तळकोकणात पडलेल्या मुसळधार पावसाने भूईबावडा घाटमार्गातील रस्त्यावर  गुरूवारी रात्री   मोठ्या भेगा पडून रस्ता  दुभंगल्याने शुक्रवार दिनांक २३ जुलैपासून  भूईबावडा घाटमार्गातून होणारी सर्व वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे .

काही दिवसापासून करूळ घाटबंद करण्यात आला होता व करूळ घाटातील वाहतूक भूईबावडा घाटमार्गे वळवण्यात आली होती. त्यानंतर हा घाटमार्ग अवजड वाहनासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला होता. मात्र अतिवृष्टीमुळे या घाटमार्गातील रस्त्यावर गुरुवारी रात्री भेगा पडल्याचे आढळून येताच बांधकाम विभागाने प्रशासनाला घाटातील वाहतूक बंद करण्याच्या सुचना दिल्याने शुक्रवार सकाळ पासून हा घाटही वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोकणात जाण्यासाठी गगनबावडा मार्ग पुर्ण बंद करण्यात आला आहे .