मराठा आरक्षण मिळणे हीच आण्णासाहेबांना आदरांजली : वसंतराव मुळीक

0
49

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक व माथाडी समाजाचे कै. आ. आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मार्केट यार्ड येथे कोल्हापूर जिल्हा माथाडी कामगार सहकारी संस्थेत वसंतराव मुळीक यांच्या हस्ते कै. आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि जेष्ठ माथाडी कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण मिळणे हीच खरी आण्णासाहेबांना आदरांजली असेल, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

यावेळी वसंतराव मुळीक म्हणाले की, २२ मार्च रोजी झालेल्या मेळाव्यात लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने आण्णासाहेबांनी जर सरकारने मराठा आरक्षण दिले नाही तर हा अण्णासाहेब उद्याचा सूर्य बघणार नाही. अशी प्रतिज्ञा केली. मात्र, आरक्षण न मिळाल्यामुळे २३ मार्च रोजी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून ती पूर्ण केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे आण्णासाहेब खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत. यानंतर ३८ वर्षे लोटली तरीही अजून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. आज या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन कै. आण्णासाहेब पाटील यांना खरी आदरांजली वाहिली पाहिजे. असे प्रतिपादन केले.  

आण्णासाहेबांनी मराठा समाजावर ज्या पद्धतीने प्रेम केले तसेच महाराष्ट्रातील माथाडी समाजावरही प्रेम केले. आण्णासाहेबांनीच या देशात पहिला माथाडी कायदा केला. कै. अण्णासाहेबांनी हमाल हा शब्द बदलून माथाडी हा शब्द प्रयोग करून खऱ्या अर्थाने माथाडी समाजाला न्याय आणि आदर दिल्याचे सांगितले.

सदाशिव खोंदल, तुकाराम खोंदल, सर्जेराव कोळी, खोतवाडीचे माजी सरपंच तानाजी कोळापटे, नांदारीचे सरपंच बबन लांबोरे यांचा सत्कार वसंतराव मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बाबुराव गावडे, गोविंद खोंदल, दिलीप पोवार, राहुल लादे, भागोजी कात्रट, युवराज खोपकर, सागर माटक, बिरदेव शिंदे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.