गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील मटण मार्केट, खणगावे गल्ली, काळू मास्तर विद्यालय परिसरात यांची संख्या जास्त आहे.

यांचा त्रास सकाळी लवकर फिरण्यास जाणारे नागरिक, वृत्तपत्र विक्रेते, भाजी विक्रेत्यांना होत आहे. यामुळे सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपालिकेने त्वरित करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांना यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.