कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी संपूर्ण लसीकरण व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन अत्यंत आवश्यक आहे. जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत असून जिल्ह्यात दुकाने, मॉल, पेट्रोल पंप आदी सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस घेणे  बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना १८ वर्षावरील नागरिकांना संपूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. आपण लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाने खूप सोपा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

*आपल्या मोबाईल वर +919013151515 क्रमांक (MyGov Corona Helpdesk) सेव्ह करावा.

*नंतर whats app वरुन या क्रमांकावर Certificate हा मेसेज पाठवावा.

*यानंतर एक ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी क्रमांक टाईप करुन या नंबरवर पाठवावा.

*यानंतर Certificate या संदेशाला क्लिक केल्यावर अवघ्या काही सेकंदांमध्ये आपण लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळेल.

हे प्रमाणपत्र मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन किंवा स्क्रीन शॉट घेऊन आपण ठेऊ शकतो, किंवा त्याची प्रिंट काढता येते, जेणेकरुन सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना सहजरित्या संपूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवणे शक्य होते.