धनगर समाजाला एकत्रित करून जनरेटा उभारणार : रामचंद्र डांगे

0
19

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन राजकीय पक्षांनी समाजाचा वापर केला आहे. समाजात दुफळी निर्माण करून सत्तेची पोळी भाजायची. आणि गरज संपल्यावर समाजाला वाऱ्यावर सोडायच काम राजकर्त्यांनी केलं आहे. यासाठी समस्त धनगर समाजाला एकत्रित करून जनरेटा उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केले. ते नृसिंहवाडी येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात आज बोलत होते.

आज शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे धनगर समाजाचा मेळावा घेण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच समाजातील विविध पदावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.दशरथ काळे, वसंत हजारे, बाबासाहेब सावगावे, चंद्रकांत जोंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना हजारे म्हणाले की, धनगर समाजात शिक्षणाची जागृती होऊ लागली आहे. समाजत शिकून सुशिक्षित बेरोजगार निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोणातून त्यांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी चळवळ निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी उमेश कर्णाळे, गणपतराव गावडे, आण्णासाहेब जोंग, आप्पासाहेब बंडगर, मल्लू खोत, प्रभाकर बंडगर, तानाजी आलासे, रघु नाईक आदी उपस्थित होते.