‘गोडसाखर’ संचलित ‘ब्रिस्क फॅसिलिटीज’कडून एकरकमी एफआरपी : वसंतराव गुजर

0
90

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचलित ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीकडून पहिल्या पंधरवड्याची ऊसाची एकरकमी एफ. आर.पी. २८०० रुपये इतकी आहे. तसेच पहिल्या पंधरवड्याची तोडणी- वाहतुकीची वाढीव दरासह बिले अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर वसंतराव गुजर यांनी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, आज (गुरुवार) २७ नोव्हेंबर रोजी झालेला बँकांचा संप व शनिवार ते सोमवारपर्यंत  बँकांना सुट्टी असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवार ३ डिसेंबरपासून आपले खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधून बिले घेऊन जावीत.  तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.