राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी गीता पाटील 

0
115

म्हालसवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी येथील माजी उपसरपंच गीता धनाजी पाटील यांची कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने कोल्हापुरात पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते गीता पाटील यांना निवड पत्र देऊन गौरविण्यात आले.

गीता पाटील यांना या निवडीकरिता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, मधुकर जांभळे, महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांचे सहकार्य लाभले.