गौतम गंभीर देणार १ रुपयांमध्ये जेवण..!

0
100

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजप  खासदार  गौतम गंभीर  यांनी लॉकडाऊनच्या काळात  स्थलांतरीत मजूर,  तृतीय पंथीयांसाठी जेवणाची सोय केली होती. आता गंभीरने पूर्व दिल्ली या  मतदारसंघात १ रुपयांमध्ये जेवण देणारी ‘जन रसोई’  हा उपक्रम सुरू केला आहे. 

होलसेलचे मोठे गार्मेंट मार्केट  असलेल्या गांधीनगरमध्ये जन रसोई कँटिन उघडण्यात आली आहे. त्यानंतर  पूर्व दिल्लीतील  दहा विधानसभा मतदारसंघात जन रसोई कँटिन सुरू करण्यात येणार आहे. येथे १ रुपयांत जेवण दिले जाणार आहे.  या कँटिनमध्ये  एकावेळी १०० लोकांची जेवणाची सोय असेल. जेवणात भात, मसूरची डाळ आणि भाजी दिली जाणार आहे.